आज शिक्षक दिन.
मानवी संस्कृती आज जर ज्या कोण्या "प्रोफेशनल" व्यक्ती समूहाच्या असामान्य योगदानामुळे टिकली असेल, सुसह्य झाली असेल, तिचा मानवी स्पर्श आजही कायम असेल आणि चांगले आणि वाईट यांच्या शाश्वत लढाईत आजही माणसाला नैतिकतेची किंमत राहू शकली असेल तर ती म्हणजे "शिक्षकां"मुळे ! एक राष्ट्र म्हणून भारताचा सहज स्वभाव हा "मार्गदर्शका"ची भूमिका मांडणारा - तत्वज्ज्ञाची भूमिका सांगणारा आहे. आणि या सहज स्वभावाला साजेसे केवळ दोनच राष्ट्रप्रमुख आजवर आपल्या देशाला लाभले... डॉ. अब्दुल कलाम आणि त्यापूर्वीचे म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्. त्यांच्यापैकीच राधाकृष्णन् यांची आज जन्म तिथी. अशा या आपल्या देशात आज शिक्षकांची अवस्था काय आहे ? शिक्षणाची अवस्था काय आहे ? ज्या राष्ट्राने जगाला "स्वाध्याय" शिकवला, "SELF study" स्वतःचा अभ्यास अर्थात आद्य अॅप्टिट्युड घेण्याची सूत्रे मांडली, मन हे शरीराचे सहावे इंद्रीय आहे आणि त्याचा अभ्यास - त्याच्यावर नियंत्रण मिळवल्याशिवाय अन्य कशावरही ताबा - आजच्या रूढ भाषेत "Command" मिळणे अशक्य आहे हे सांगितले त्याच देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अस्तित्वासमोरच आज अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत.
आजची वृत्तपत्रे वाचताना दोन लेख वाचायला मिळाले. लोकसत्ता आणि सकाळ या आघाडीच्या मराठी दैनिकांमधील हे दोन लेख होते. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासमोरील आव्हाने आणि बदल सुचविणारा "हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र : प्रिपेरिंग फॉर द फ़्युचर - न्यू आयडीयाज् अॅंड पाथवेज" हा अहवाल नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्याची पार्श्वभूमी आणि आजच्या शिक्षक दिनाचे निमित्त हे या लेखामागील कारण. तसेच ज्या समितीने हा अहवाल राज्य सरकारला सादर केला त्या समितीचे अध्यक्ष होते अनिल काकोडकर. आणि उच्च शिक्षणासंदर्भातच त्यांचे एक व्याख्यान आमच्या कार्यालयाने काही महिन्यांपूर्वी आयोजित केले होते. त्यावेळी समितीच्या धोरणाची- दृष्टीकोनाची एकंदर दिशा मला जवळून पहायलाही मिळाली होती. त्यामुळे सदर लेख लिहायचा मोह मी टाळू शकलो नाही.
मला या अहवालातील सगळ्या शिफ़ारसी वाचायला मिळालेल्या नाहीत. पण जेव्हढं ऐकायला मिळाले किंवा चर्चेतून कळले त्यात मला इतकेच जाणवले की पुन्हा एकदा पाश्चिमात्य विद्यापीठीय रचनेच्या अंधानुकरणापेक्षा किंवा फार तर शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी खासगीकरणाच्या पर्यायापेक्षा पलिकडले काहीही या समितीला टिपता आलेले नाही. मला आश्चर्य वाटले की उच्च शिक्षणाच्या शिफारसी देणाऱ्या या समितीचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असल्याचे आढळत नाही, उलट तो शैक्षणिक पद्धती किंवा शैक्षणिक व्यवस्था हा होता. स्वाभाविकच उच्च शिक्षणाकडे विद्यार्थी का वळले पाहिजेत, ते आज का वळत नाहीत, त्यांना महाविद्यालयीन किंवा विद्यापिठीय वर्गांमध्ये निव्वळ ज्ञानाच्या ताकदीवर असनस्थ करणे आता का शक्य होवू शकत नाही अशा मुद्यांकडे समितीनी फ़ारसे लक्ष दिलेले नाही. स्वायत्तता आणि खासगी गुंतवणूकीची भाषा करणारा हा अहवाल अजूनही "उत्तरदायित्वाची" भाषा करीत नाही... आणि मी दोन्ही प्रकारची उत्तरदायित्वे म्हणतो आहे शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले आणि विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी असलेले ! मूळात भारतात शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी राहिलाच नाही. आणि मी मुले म्हणत नाही तर विद्यार्थी म्हणतो आहे.. ज्यांना ज्ञान मिळवण्याची आस आहे अशांना शिक्षण पद्धतीत आज काय स्थान आहे ? आणि समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफ़ारसींमुळे सुद्धा काय विशेष स्थान मिळणार आहे ?
पण मला सर्वात प्रामुख्याने वैषम्य वाटते ते "अनुकरण" पद्धतीचे. आता हेच पहा ना... महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विषयक आव्हानाना सामोरे जाणारी समिती आणि तिच्या अहवालाचे शीर्षकच इंग्रजीतून. साधा प्रश्न आहे, या समितीचा अहवाल ग्रामीण महाराष्ट्रातील किती जणं उत्साहाने वाचू शकतील ? शिक्षणाचे मूलभूत उद्दीष्ट हे प्रत्येक विद्यार्थ्याला-विद्यार्थिनीला स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करण्यास मदत करणे हे असते. यामध्ये स्वतःचे विचार, सर्जनशीलता-उत्तमतेचा ध्यास, स्वत्त्व यांचा समावेश होतो. पण जिथे मूळ शिक्षणपद्धती "आंग्ल", त्याला पर्याय देणारेही "अनुकरणवादी" अशातून स्वयंस्फूर्तता कशी येवू शकेल ? समाजाच्या वास्तवाशी भान सुटत चाललेले, "OH god !", "How these people survive" असे आपल्याच बांधवांबद्दल बोलणारे आणि तरीही स्वतःला विचारवंत म्हणविणारे लोक हेच या शिक्षणव्यवस्थेसमोरील खरे आव्हान आहे. आणि जर शिक्षणातून "आत्मभान", स्वयंस्फूर्तता येणार नसेल... स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होणार नसेल, स्वतःच्या राष्ट्राबद्दल अभिमान जागृत होणार नसेल तर कशासाठी शिकायचं ?
मला अजून एक जाणवलं : आजवर कोणत्याही समितीने "कशासाठी शिकायचे ?" या प्रश्नास हात घातलेला नाही. शिकण्याची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्याना अनेक गाजरे [ जसे : माध्यान्ह भोजन योजना, मोफत गणवेश वाटप योजना] दाखविली जातात. पण मूळ शिक्षकांच्या दर्जात, त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीत मात्र जराही बदल केला जात नाही. किंवा कशासाठी शिकायचे याचे नेमके, पटणारे आणि मूल्याधिष्ठित स्पष्टीकरणही मिळत नाही. याच प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे शिक्षकांनाही आपण का शिकवतो आहोत याचे "पोटापाण्यासाठी" किंवा अगदी सुसंस्कृत शब्दांत सांगायचे तर "चरितार्थासाठी" यापलीकडील उत्तर अभावानेच सापडते.
कोणताही आयोग अथवा समिती ही जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे देत नाही / शोधत नाही किंवा या समस्येला "ADDRESS" करीत नाही तोपर्यंत कोणताही शिक्षणविषयक अहवाल आपल्या मूळ समस्येवर उत्तरे देऊ शकणार नाही. शिवाय क्रीडा आणि शिक्षण या दोन वरकरणी भिन्न मानल्या जाणाऱ्या बाबी जोवर एकसमयावच्छेदेकरून धोरणात्मकपातळीला हाताळल्या जात नाहीत तोवर शिक्षण विषयक समस्या सुटू शकत नाही. खेळ हा मस्ती किंवा रग "Channelise" करण्याचा एक अतिशय मार्मिक प्रकार आहे. तरुणांना जोवर अंगातील रग जिरवायला अभ्यासक्रमातूनच वाव मिळत नाही तोपर्यंत त्यांचे "भरकटणे" अटळ आहे. आणि यासाठीच क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही बाबी समांतरपणे नव्हे तर एकत्रितपणे हाताळल्या गेल्या पाहिजेत.
उच्च शिक्षणासंदर्भात मला अजून एक वाटतं... आज पदवी-पदव्युत्तर आणि त्यापुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा समाजाशी असलेला संपर्क तुटत जातो. MSW सारखा एखादा कोर्स वगळता सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामिलकी या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांपासून वंचित राखल्या जातात. शाळेतून महाविद्यालयीन दशेत जाणारा विद्यार्थी मूळात आपल्या कुटुंबापासून दुरावत जातो. आणि पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत तर तो समाजापासूनही दुरावतो. मग त्याच्याकडून "सामाजिक बांधिलकीची", देशासाठी - आपल्या ज्ञातीसाठी काही करण्याची अपेक्षा कशी ठेवावी ? निःस्वार्थी भूमिका अंगी भिनण्यासाठी समाजतल्या जळजळीत वास्तवाचे चटके सोसावे लागतात. आपल्या उच्च शिक्षणात याचा अभाव आहे.
पहा ना, आपल्या शालेय शिक्षणात मूल्यशिक्षण आहे पण त्या शिक्षणाने आपले "मूल्य वर्धन" [Value Addition] झाले का हे तपासणारी यंत्रणा उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये उपलब्ध नाही. विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेताना गुणांचे / Marks चे बंधन आहे.. पण शिक्षकांना गुणांचे सोडाच साधे गुणवत्तेचेही बंधन नाही. महाविद्यालये आणि मेरीटोरियस विद्यार्थी यांना "ग्लॅमर" आहे पण ते महाविद्यालय आणि असे विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना ग्लॅमर नाही. समितीच्या अहवालात हे प्रश्न address झाले असते तर अध्यापनाचा दर्जा या मुद्द्याचा समावेश न झाल्याबद्दल वृत्तपत्रातून ओरड झाली नसती.
मी शिक्षणतज्ज्ञ नाही किंवा या क्षेत्राचा अभ्यासकही नाही पण मला शिक्षण घेताना कोणत्या अडचणी आल्या होत्या याची जाणीव जपणारा मी एक नागरीक आहे. आणि म्हणूनच लेखाच्या शेवटी मला सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचेच एक वाक्य आठवते. शिक्षणाचे उद्दीष्ट काय असावे या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले होते...
"The education should be MAN making - Conscience developing !"
आपण जयंत्या साजरे करण्याच्या बरोबरीनेच या विधानाची जाण ठेवायला हवी नाही का ?

No comments:
Post a Comment